महाळुंगे, दि.03 (पीसीबी)
वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनातून सात टायरचा अपहार केला. ही घटना १६ डिसेंबर रोजी बजाज कंपनी शेजारील पार्किंग मध्ये घडली.
सुदाम केरबा पोळे (वय २७, रा. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. याप्रकरणी जगन्नाथ अप्पाजी चव्हाण (वय ५८, रा. थेरगाव) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम पोळे हा फिर्यादी यांच्या आयशर टेम्पोवर चालक म्हणून काम करतो. त्याने टेम्पो मधील ८९ हजार रुपये किमतीचे सात टायर स्वतःच्या फायद्यासाठी विकून त्याचा अपहार केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.