मुंबई, दि. 15 (पीसीबी) : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मुहुर्त मिळाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.
महाराष्ट्राच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळात जोरदार तयारी करण्यात आली होती. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. राज्यतील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती मोठी खेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे. नुकताच या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली.
चित्रा वाघ (भाजप) विक्रांत पाटील (भाजप) बाबूसिंग महाराज राठोड (भाजप) मनीषा कायंदे (शिंदे गट) हेमंत पाटील (शिंदे गट) पंकज भुजबळ (अजित पवार गट) इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)