साताऱ्यात आज धडाडणार डॉ. अमोल कोल्हेंची तोफ

0
181
  • आज कोल्हे घेणार सहा सभा

पुणे : शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आपल्या मतदारसंघासोबत राज्यातील इतर ठिकाणी सभांचा धडाका सुरू असून अमोल कोल्हे यांच्या आज माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात तब्बल सहा जाहीर सभा होत आहेत.

अमोल कोल्हे आपला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गड सांभाळत राज्यभर प्रचार तोफांचा धडाका सुरू केला असून आज त्यांच्या सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी सभा घेत आहेत.