सातारा येथे राज्य स्तरीय गतका खेळांच्या स्पर्धा पार पडल्या

0
59

पिंपरी, १७ जुलै (पीसीबी) – सातारा येथे दिनांक १३ आणि १४ जुलै २०२४ रोजी राज्य स्तरीय गतका खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड संघातील १९ खेळाडू सहभागी झाले होते.
गतका हा पंजाब राज्याचा पारंपारिक खेळ असून याला खेलो इंडिया आणि राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा तसेच शालेय खेळ म्हणून देखील मान्यता प्राप्त आहे. पिंपरी चिंचवड मधील खेळाडूंनी मुख्यतः फरी सोटी, टीम फरी सोटी आणि वयक्तिक डेमो या खेळ प्रकारात भाग घेऊन पिंपरी चिंचवड साठी एकूण २४ पदकांची घवघवीत कमाई केली. त्यामध्ये १३ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.


या स्पर्धेमधील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची ऑगस्ट महिन्यात पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय गटका स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशा बद्दल गतका असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.
प्रशिक्षक रविराज चखले, स्मिता धिवार, संजय बनसोडे, किरण अडागळे, केतन नवले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
विजयी खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.

११ वर्षा खालील मुली –
खेळ प्रकार – टीम फरी सोटी – सुवर्ण पदक.
१) तानसी ठोंबरे
२) ऋतुजा कुलकर्णी
३) तृप्ती यादव.

खेळ प्रकार – वयक्तिक प्रात्यक्षिक
१) रिध्दीका पाटील – कांस्य पदक.
२) ऋतुजा कुलकर्णी – कांस्य पदक.

१४ वर्षा खालील मुली
खेळ प्रकार – फरी सोटी
प्रिया सैनी – सुवर्ण पदक
खेळ प्रकार – वयक्तिक प्रात्यक्षिक
प्रिया सैनी – कांस्य पदक.

१७ वर्षा खालील मुली
खेळ प्रकार – टीम फरी सोटी – सुवर्ण पदक.
१) श्रेया दंडे
२) साक्षी सैनी
३) भाग्यश्री बांगर.

खेळ प्रकार – वयक्तिक प्रात्यक्षिक
१) श्रेया दंडे – सुवर्ण पदक.

११ वर्षा खालील मुले
खेळ प्रकार – वयक्तिक प्रात्यक्षिक
१) सोहम चोळकर – रौप्य पदक.
२) ओम परदेशी – कांस्य पदक.

१४ वर्षा खालील मुले
खेळ प्रकार -टीम सिंगल सोटी – सुवर्ण पदक.
१) राज वायकोळे
२) नैतिक ऊनेचा
३) भार्गव देडे.

खेळ प्रकार – टीम फरी सोटी – कांस्य पदक
१) लकी शिंदे
२) सुरज बांगर
३) ओमराजे जाधव.

खेळ प्रकार – वयक्तिक सोटी
१) ओमराजे जाधव – रौप्य पदक
२) भार्गव देडे – कांस्य पदक.

१७ वर्षा खालील मुले
खेळ प्रकार – वयक्तिक फरी सोटी
१) शिवदत्त सिंघ – सुवर्ण पदक
२) श्रेयस चव्हाण – कांस्य पदक.

२५ वर्षा खालील मुले
खेळ प्रकार – वयक्तिक प्रात्यक्षिक.
१) गणेश चखाले – सुवर्ण पदक.