सातारचे आकाला वाचवण्यासाठी गृहमंत्र्यांचा आटापीटा – रोहित पवार

0
20

मुंबई, दि. २७ , : सातारचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले होते. विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. अशातच या प्रकरणाचा धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न गृहमंत्री करत होते. आता सातारच्या एका आकाला वाचवत आहेत. कुणाल कामराच्या स्टुडिओवर हल्ला करणारे आणि कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अत्यंत दारूण झाली आहे. याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना वाघ्या श्वानाच्या समाधीवरून चाललेल्या वादावरही राऊत बोलले.

मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा, महाराष्ट्राला त्यात ओढू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरचे सगळेच मावळे, प्राणी आणि पक्षी हे निष्ठावान म्हणून गणले जातात. इतिहासामध्ये काही दाखले काही संदर्भ ते इतक्या वर्षानंतर खोदकाम करणं योग्य नाही. लोकांनी काही संदर्भ भावनिकदृष्या स्वीकारले असतात. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होतील अशी भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्याने घेऊ नये, या मताचे आम्ही आहोत. ताराराणी यांनी औरंगजेबाला झुंजवलं आणि मराठ्यांचं शौर्य काय आहे हे दाखवलं. ज्या लोकांना औरंगजेबाची कदर उद्ध्वस्त करायची आहे त्यांनी ताराराणींच्या स्मारकाकडे नजर टाकावी आणि आपलं काही चुकतंय का हे पाहावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.