साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा संदर्भात सी आय डी चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

0
402

पिंपरी (पीसीबी) दि.१७ – दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येणार, म्हणून अधिवेशनात उदय सामंत मंत्री ह्यांनी घोषणा केली होती. त्या संदर्भात परिस्थिती अशी आहे की ४६ वर्ष शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा संदर्भात संघर्ष करावा लागला. त्या वेळी गेल्या अनेक वर्षांपासून एजंट व बिल्डर ह्यांनी शेतकरी बांधवांना पैशाचं आमिष दाखवून शेतकरी बांधवांच्या जमीन साठेखत करून शेतकऱ्यांना फसवणूक प्रकार केले असून, पिंपरी चिंचवड येथील शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येणार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

आत्ता जमीन भूखंड किमती खुप मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून ह्यापूर्वी शेतकरी बांधवांनी अल्प दराने कमी मोबदला घेऊन जमीन भूखंड साठे खत करून बिल्डर व एजंट ह्यांना निराशापोटी दिल्या आहेत. त्यावेळी शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळत नव्हता शेतकरी बांधव निराश होऊन बिल्डर व एजंट ह्यांना बळी पडला. त्यामुळे शेतकरी बांधव ह्यांनी जमीन भूखंड साठे खत करून विक्री केली होती. त्या संदर्भात आपण स्वतः दखल घेऊन सी आय डी चौकशी करण्यात यावी, शेतकरी बांधवांना फसवणूक प्रकार घडले असून त्या संदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी गरज आहे. भूखंड परतावा देताना तो भूखंड फक्त शेतकरी बांधव ह्यांना मिळाला पाहिजे तसेच सदर साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा शेतकरी बांधवांना २५ वर्ष खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाही.

अशी अटी शर्ती नियमानुसार धोरण जाहीर करुन देण्यात यावा ही नम्र विनंती. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर व राजकीय नेते मंडळी ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा फक्त शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे, असे ही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.