मुंबई, दि. ८ (पीसीबी) : व्हिडिओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने शुक्रवारी (२३ डिसेंबर) संध्याकाळी ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली. चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्युएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली.
मुंबई उच्च न्यायालयाने ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या कारवाईवर ताशेरे ओढत न्यायालयाने कोचर दाम्पत्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयची कारवाई कायद्याला अनुसरुन नाही, असे सांगत न्यायालयाने कोचर दाम्पत्याला हा दिलासा दिला आहे.