‘साडेअठ्ठावीस किलोचं भूत राज्याच्या मानगुटीवर’

0
3

चलो मुंबई, घोषणेवर मनोज जरांगे ठाम, राज्य सरकारचं टेन्शन वाढलं

बीड, दि. २६ : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाची घोषणा केली आहे. ज्यासाठी त्यांनी लाखोंच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन मराठ्यांना केले आहे. या 27 तारखेला ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. त्याआधी त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलनाची रुपरेषा सांगितली. तर दुसरीकडे बीडच्या गेवराईत मात्र लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. यावरुन हाकेंनी आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंना डिवचले आहे. पोलिसांवरही निशाणा साधला आहे. तर ओबींसींनीही आता रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राडा झाल्यानंतर हाकेंसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, यावरुन हाकेंनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. बीड पोलिसांनी आमच्यावर गुन्हा नोंदवताना जी तत्परता दाखवली, ती मनोज जरांगे यांच्याविरुद्ध का दाखवत नाहीत, असा सवाल हाकेंनी उपस्थित केला.


जरांगेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी 29 ऑगस्टपासून पुन्हा मुंबईमध्ये उपोषम सुरु होणार आहे. त्याआधी जरांगेंनी 24 ऑगस्टला बीडमध्ये मराठी समाजाला संबोधित करताना म्हटले होते की, मराठे एकत्र आले की यांची फाटते. आपण एकत्र आल्याने समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या, हे समजून घ्या, असा एल्गार जरांगेंनी पुकारला, पण हाकेंनी त्यांना पुन्हा डिवचले आहे. हाके म्हणाले, जरांगे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहेत. हे साडेअठ्ठावीस किलोचं भूत राज्याच्या मानगुटीवर बसलं आहे. घरं, मालमत्ता जाळल्या जात आहेत. हल्ले होत आहेत, सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत आहे.