साईड देण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण

0
102

महाळुंगे,दि. 05 (पीसीबी) : रस्त्याने जाताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाला साईड न दिल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी दहा वाजताच्या सुमारास पाईट ते खेड रोडवर पाईट गावाजवळ घडली.

ओम विजय मंजरतकर (वय 20, रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज कैलास केदारी, संजय सतीश सावंत (दोघे रा. पाळू, ता. खेड), एकनाथ रोहिदास जाधव (रा. अनावळे, ता. खेड) आणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओम आणि त्यांचा मित्र पियुष उडाने हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुधाच्या पिकपला त्यांनी साईड दिली नाही. त्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करून ओम आणि त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केली. तसेच दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. सुरज आणि संजय या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.