साईड देण्याच्या कारणावरून पिकअप चालकाला मारहाण

0
140

दि २६ एप्रिल (पीसीबी ) – रस्त्याने जात असताना साईड देण्याच्या कारणावरून रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने एका पिकअप चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २५) सकाळी पुणे-नाशिक रोडवर तळेगाव चौक चाकण येथे घडली.

अभिषेक बाळासाहेब कोंढावळे (वय २७, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश अशोक लोखंडे, रोहित शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोंढावळे हे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. त्यांच्या पाठीमागून एक रिक्षा आली. रिक्षा चालकाने हॉर्न बजावल्याने कोंढावळे यांनी पिकअप थांबवले. त्यानंतर आरोपी मंगेश याने कोंढावळे यांना ‘साईड देता येत नाही का’ असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली. तर आरोपी रोहित शिंदे याने हातातील स्टीलच्या कड्याने मारून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.