सांगवी मध्ये दोघांकडून 15-20 वाहनांची तोडफोड

0
80

सांगवी, दि. 15 (प्रतिनिधी)

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव परिसरात दोघांनी 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे चार वाजताच्या सुमारास मयूर नगरी येथे घडली.

याबाबत माहिती अशी की, पिंपळे गुरव परिसरातील मयूर नगरी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांना दोन अनोळखी तरुणांनी लक्ष्य केले. पहाटे चार वाजताच्या सुमारास दोघेजण तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी दिसेल त्या वाहनावर कोयत्याने मारून वाहनांचे नुकसान केले.

या घटनेमध्ये सुमारे 15 ते 20 वाहनांचे नुकसान झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. घटनेची माहिती मिळतात सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोडफोडीचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. तोडफोड करणाऱ्या दोघांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

विनाकारण उच्छाद मांडणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. तोडफोड प्रकरणांमध्ये वाहनांच्या काचा फुटल्याने त्याबाबत विमा संरक्षण देखील वाहन मालकांना मिळत नाही. त्यामुळे वाहन मालकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे तोडफोड झालेल्या वाहनांचे मालक सांगतात.