सांगवीतील वकिलाला सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी

0
179

नवी सांगवी , दि.२९ (पीसीबी) – नवी सांगवी येथील एका वकिलाला सोशल मीडियाच्या तीन वेगवेगळ्या अकाउंट वरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि.25) रात्री व मोबाईल वरून उघडकीस आला.

याप्रकरणी रोहन बाळासो जमादार(माळवदकर) (वय 28 राहणार नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी(दि.28) फिर्याद दिली असून दोन फेक इंस्टाग्राम आयडी व फेक फेसबुक अकाउंट वरून धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना दोन इंस्टाग्राम अकाउंट वरून व एका फेसबुक अकाउंट वरून फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.