सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने उडवला भाजपचा धुवा

0
341

सांगली, दि. २९ (पीसीबी) – सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महाविकास आघाडीने १६ विरुद्ध 0 अशा प्रकारे ने भाजपचा धुवा उडवला आहे. व्यापारी गटात दोन उमेदवार स्वतंत्र निवडून आले आहेत.

तानाजी सावंत भुईसपाट -विधानसभेसाठी जोरदार तयारी कऱणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसला आहे. परांडा बाजार समितीत मविआला १८ पैकी ११ जागांवर विजयी मिळाला असून सावंत यांच्या समर्थकांचा दणकून पराभव झाला आहे.

संगमनेर बाजार समितीत काँग्रेसची घोडदौड! विखे पाटलांना धक्का –
संगमनेर बाजार समितीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात गटाने खतं उघडलं आहे. आत्ता पर्यंत थोरता गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का बसताना दिसत आहे.