सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण सुरू

0
253

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाद्वारे (एनएसओ)  ‘आयुष व व्यापक वार्षिक मोड्युलर सर्वेक्षण’ विषयावरील पहिले देशपातळीवर सर्वेक्षण सुरू झाले आहे.

सर्वेक्षणासाठी माहिती संकलन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय आणि राज्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांद्वारे केले जाईल. जुलै 2022 ते जून 2023 असा सर्वेक्षण कालावधी असेल. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी कम्प्युटर असिस्टेड पर्सनल इंटरव्युविंग (सीएपीआय कॅपी) मोड्युलच्या आधारे टॅबलेट वापरून माहिती संकलन केली जाईल.

‘आयुष व व्यापक वार्षिक मोड्युलर सर्वेक्षणा’तून जागरूक नागरिक, रुग्णालयात दाखल व्यक्ती, उपचारावर व औषधांवर होणारा खर्च. बाह्यरुग्ण, प्रसतिपूर्व व प्रसवोतर काळजी आणि व्यापक सर्वेक्षणातून शाश्वत विकास उद्दिष्टे व जागतिक निर्देशांकाचे उप निर्देशक तयार करणे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (जीआयआय), ग्लोबल कॉम्पिटिशन इंडेक्स (जीसीआय) व ई-गव्हर्नमेंट इंडेक्स (इजीआय), ग्लोबलायझेशन इंडेक्स (जीआय) व शालेय शिक्षणाची सरासरी वर्षाची माहिती संकलित केली जाईल.