सहा झाडांचा चक्क चमनगोटा

0
9

 महापालिकेच्या उद्यान विभाग कर्मचाऱ्यांनी प्राधिकरणातील
सेक्टर 24 मध्ये आज सहा पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या फांद्याचं नव्हे तर बुंधा सोडून बाकी चमन गोटा केलाय. मुळात अशा पद्धतीने सर्व झाडांच्या फांद्या का तोडल्या त्याचे उत्तर मिळत नाही.
कशासाठी हे केले आणि कोणी परवानगी दिली, कारण काय आहे याचेही निराकरण प्रशासन करत नाही.
शहरात अशा पद्धतीने अनावश्यक वृक्ष छाटणी सर्रास सुरू असते. प्रशासनाची बेफिकिरी दिसून येते, असा आरोप ज्येष्ठ निसर्ग प्रेमी
धनंजय शेडबाळे यांनी केला आहे.