सहायक फौजदाराला नोकरी घालवण्याची धमकी.

0
288

सांगवी, दि. २३ (पीसीबी) – पोलिसांना संबंधित व्यक्तीची तक्रार घ्यायची नाही, असे म्हणत तिघांनी पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच पोलिसांना त्यांची नोकरी घालवतो, अशी धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्यात घडली.

अनिकेत मनोज चव्हाण (वय 28, रा. नवी सांगवी), अक्षय संभाजी शिंदे (वय 23, रा. पिंपळे गुरव), ओंकार सुधाकर घाडगे (रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार विजय शेलार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहायक फौजदार शेलार हे गुरुवारी मध्यरात्री सांगवी पोलीस ठाण्यात हजर असताना आकाश सचिन भापकर (वय 24, रा. नवी सांगवी) हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी सचिन यांचे मित्र आरोपी देखील पोलीस ठाण्यात आले. आरोपींनी सचिन याची तक्रार घ्यायची नाही, असे म्हणत अरेरावी करून फिर्यादीस तुमची नोकरी घालवतो अशी धमकी दिली. फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.