सहशहर अभियंता पदावर देवन्ना गट्टूवार

0
95

पिंपरी, दि. ४ -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहशहर अभियंता या पदावर कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती करण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिका आस्थापनेवर सहशहर अभियंता अभिनामाची पदे कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय नुसार कार्यकारी अभियंता या पदावरील शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, शिस्तभंग आणि मत्ता व दायित्वाची माहिती, संगणक अर्हता आदी सेवाविषयक तपशील पडताळून कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांना शासन मान्यतेच्या अधिन पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती समितीने सर्वानुमते शिफारस केली होती.