सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाच स्वीकारताना अटक

0
282

लाच मागितल्याने तसेच स्वीकारल्याने सहकार आणि शिक्षण विभाग सर्वात बदनाम झाला. सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाख रुपये लाच स्वीकारताना जन अटक करण्यात आली. सिन्नर येथील सहाय्यक उपनिबंधकांना वीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली. नाशिकच्या शिक्षण विभागातील लाचखोरी प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून हा विभाग अत्यंत बदनाम झाला आहे.

या विभागात कारवाई झाल्यानंतर येणारे नवे अधिकारी देखील त्याच भ्रष्ट मार्गाने पुढे जात असल्याने सलग तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यामुळे या विभागात रुजू झाल्यावर अधिकाऱ्यांनी ‘मी शिक्षण विभागात काम करतो हे सांगण्याची लाज वाटते’ असे विधान केले होते. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे देखील लाचखोरीच्या प्रकरणांमुळे व्यतीत झाले होते.

त्यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. नाशिक विभागातील कारवाई आणि प्रशासनातील रुजलेल्या लाच स्वीकारण्याच्या या प्रकरणामुळे हा भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे की काय अशी स्थिती आहे. विभागात 161 खटले दाखल झाल्याने नाशिक यामध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे.

वर्षभरात 2 कोटी 15 लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. यामध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिकच्या एसीबीच्या कारवाईची राज्यभरात चर्चा आहे. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि अप्पर अधीक्षक माधवी रेड्डी यांच्या टीमने ही कारवाई केली.