सहकारी सुरक्षा रक्षकाने केली 90 हजारांची फसवणूक

0
519

काळेवाडी, दि. १२ (पीसीबी) – सुरक्षारक्षक म्हणून काम करत असताना सहकारी सुरक्षा रक्षकाच्या बॅगेतील एटीएम घेऊन त्याद्वारे 90 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 28 ते 29 ऑगस्ट या कालावधीत बँक ऑफ बडोदा काळेवाडी शाखा आणि इतर बँकेच्या एटीएम मध्ये घडली.

अजय कुमार गिरी (रा. बाणेर. मूळ रा. पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी राजाराम शंकरराव यलजी (वय 76, रा. थेरगाव) यांनी रविवारी (दि. 11) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजाराम हे काळेवाडी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये वॉचमन म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत आरोपी अजय कुमार हा देखील वॉचमन म्हणून काम करत होता. फिर्यादी यांनी एटीएम मध्ये ठेवलेल्या बॅगेतील एटीएम कार्ड घेऊन आरोपीने वेगवेगळ्या एटीएम मधून फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून 90 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.