सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल

0
63

पुणे, दि. 24 (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी भव्य रॅली काढली.

आंबेगावचे सात वेळा आमदार राहिलेले दिलीप वळसे पाटील हेही पक्षाचे स्टार प्रचारक आहेत.

दिलीप वळसे पाटील यांच्यासमवेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भाजपचे तालुकाप्रमुख संदीप बनखेले, त्यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील, कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते