सव्‍वा तासात दुचाकी चोरीला

0
7

भोसरी, दि. ९

मोशीतील कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती येथे खरेदीसाठी आलेल्‍या एका ग्राहकाची गाडी अज्ञात चोरट्याने अवघ्‍या सव्‍वा तासात चोरून नेली. ही घटना मंगळवारी सकाळी सव्‍वा आठ वाजताच्‍या सुमारास उघडकीस आली.

सुनील चंदु येवले (वय ४०, रा. मु. पो. कान्‍हेवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी बुधवारी (दि. ८) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपली ३० हजार रुपये किंमतीची (एमएच १४ एफवाय ८८३९) ही दुचाकी मोशी येथील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या आवारात मंगळवारी सकाळी सात वाजताच्‍या सुमारास उभी केली होती. ते आपले काम उरकून पुन्‍हा ८.२० वाजता आले असता त्‍यांना दुचाकी चोरीस गेल्‍याचे दिसून आले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.