सर्व स्थानिक शेतकरी, युवक व महिलांनी मिठाई वाटप व फटाके वाजवून ह्युंडाई कंपनीच्या निर्णयाचे स्वागत केले.

0
273

तळेगाव, दि. १४ (पीसीबी) – नवलाख उंबरे, तळेगाव MIDC, पुणे येथील जनरल मोटर्स चा प्लांट हुंडई कंपनी घेत आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व स्थानिक शेतकरी, युवक व महिलांनी मिठाई वाटप व फटाके वाजवून केले.

आमच्या माहिती नुसार महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्थानिकांनी मिठाई वाटून – फाटके वाजवून कंपनीचे स्वागत केले असेल.ह्या गोष्टीची नोंद माध्यमांनी घेतली पाहिजे ही अपेक्षा आहे, जेणे करून तळेगाव MIDC मध्ये उद्योग सुखरूप आहेत हा विश्वास सर्व उद्योजकांमध्ये येईल व या भागात उद्योग – व्यवसाय करण्यास प्राधान्य मिळेल.