सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी – चंद्रशेख बावनकुळे

0
345

नागपूर, दि. ८ (पीसीबी) – एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय माघारी घेण्याचा सपाटा सुरूच असताना आता आणखी एका निर्णयाची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षण या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता या मागणीवर काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर महाविकास आघाडीकडून यांनी जोरदार टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकार स्थापन होण्याआधीच इतकी घाई कशासाठी? असा सवाल केला आहे. दरम्यान या मागणीवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार राम कदम यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून महाविकास आघाडी नेत्याने आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ?
महाविकास आघाडी सरकारने केलेली स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करावी. हाविकास आघाडी ने केलेल्या प्रभाग रचना , गन रचना या सदोष आहे, त्यामुळे त्या रद्द करून नव्याने कराव्या.
स्थानिक स्वराज्य संथाच्या प्रभाग रचना झाल्या त्यात अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य करून घेतल्या, त्यावर हजारो हरकती आल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येणार याचा प्रयत्न केला गेला.
आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्या तपासून पुन्हा रचना कराव्या अशी मागणी केली, ते झाल्याशिवाय कुठलीही निवडणूक घेऊ नये. आयोगाने तातडीने या प्रभाग रचना रद्द कराव्या अशी आमची मागणी आहे.