सर्व पदाधिकारी शिवसेनेतेच! हकालपट्टी मागे

0
301

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची केलेली हकालपट्टी पाठीमागे घेण्यात आली आहे. चिंचवडमधील सर्व पदाधिकारी शिवसेनेतच असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल कलाटे यांचे हे पदाधिकारी काम करत असल्याचे सांगितले होते.

शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी 8 पदाधिकाऱ्यांची 20 फेब्रुवारी रोजी हकालपट्टी करण्यात आली होती. त्याबाबत प्रसिद्धीपत्रकद्वारे माहिती दिली होती. त्यावर पक्षाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा संघटक अनिता तुतारे, उपशहर संघटक रजनी वाघ, विभाग संघटक शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ , तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा संघटक गणेश आहेर, रवी घाटकर यांची गैरसमजुतीने इतर वृत्तपत्रांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी केल्याची बातमी छापून आली होती.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व पदाधिकारी हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच असून, त्यांना दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील, अशी माहिती शिवसेना (उद्धव , बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.