सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार विजेत्या आकांक्षा पिंगळेचा माजी महापौर योगेश बहल यांच्याकडून गौरव

0
360

पिंपरी,दि. २३ (पीसीबी) यावर्षीचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार हा पुरस्कार पिंपरी-चिंचवडची आकांक्षा लक्ष्मण पिंगळे हिने पटकावला. त्याबद्दल तिच्या घरी जाऊन तिचे शहराचे माजी महापौर योगेश बहल यांनी कौतूक केले.पुष्पगुच्छ व भेट देत सत्कार केला.पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या.तिने शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावून पिंपरी-चिंचवडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे,असे बहल यावेळी म्हणाले.

आकांक्षा व तिचे कुटुंब हे संत तुकारामनगर,पिंपरी येथे बहल यांच्या प्रभागात (क्र. २० जुना,तर आता ४२) राहण्यास आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील मुलीने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवल्याचे समजताच काल रात्रीच बहल हे आकांक्षाच्या घरी गेले. पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष व महापालिकेतील विरोधी पक्षनेते राहिलेले बहल हे सध्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते तथा समन्वयक आहेत.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे काल दिल्लीत जाहीर झाले.त्यात मराठी चित्रपट आणि मराठी कलाकारांनी बाजी मारली.सुमी हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट (मराठी) ठरला.त्यातील सुमीच्या मुख्य़ भुमिकेसाठी आकांक्षाची सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार म्हणून निवड झाली.ग्रामीण भागातील मुलीची शिक्षणासाठीची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट,सर्वोत्कृष्ट बालकलाकार (मुलगी) आकांक्षा आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार (मुलगा)दिव्येश इंदूलकर व सुवर्णकमळ असे चार पुरस्कार या चित्रपटाने मिळवले आहेत.