सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण

0
277

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण उरलेला आहे. असं वक्तव्य राऊत यांनी यावेळी केलं आहे.

सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

दरम्यान राऊतांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील राजकारणावर बोलताना माजी राज्यपाल कोश्यारी यांच्या १२ आमदारांच्या पत्राच्या सहीसंदर्भात केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी खोटे बोलत आहेत, मंत्रीमंडळाने शिफारस केली त्यावर ७२ तासाच्या आत निर्णय घ्यायला पाहिजे होता तो का नाही घेतला असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण उरलेला आहे. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी सुनावणीपूर्वी दिली. तसेच सरकारवर निशाणा साधत देशातील यंत्रणा गुलामी करतात असा आरोप त्यांनी यावेळी केला.

निवडणूक आयोगाचा निर्णय अतिरेकी. आयोगाचा निर्णय हा एकतर्फी आहे. २ हजारं कोटींच पॅकेज वापरंल. सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणूक आयोगाचा निर्णय असा पुनरुच्चार राऊत यांनी केला. जनता शिवसैनिक पेटून उठले आहेत.

निवडणुक घ्यायची हिंमत दाखवा मग पाहू. गेल्या ५ महिन्यातलं राजकारण असत्याच्या आधारावर. खवळलेल्या जनतेला कसं गप्प कराल? नेते, पदाधिकारी खरेदी करण्यासाठी रेट कार्ड ठरलेलं आहे. असा दावा राऊत यांनी यावेळी केला.

कोश्यारी यांच्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले, कोश्यारी खोटं बोलतायत कॅबिनेटची शिफारस ७२ तासांत मंजूर करायची असते. कोश्यारी भाजपच्या आदेशाने वागत होते. त्यांनी घटनात्मक कर्तव्य का पाळलं नाही हे सांगावं. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.