सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील मागासवर्गीय कुटुंबे आणि महिलांना मोठ्या प्रमाणात विकासाची संधी देणारा अर्थसंकल्प:

0
4

आ. अमित गोरखे

पिंपरी, दि.. १ देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजना सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना अधिक विकासाची संधी मिळेल. तूर उडीद आणि मसूर डाळींसाठी सहा वर्ष विशेष अभियान राबवल्यामुळे शेतकरी वर्गाला चांगला आधार प्राप्त होणार आहे. भाजीपाला आणि फळ उत्पादनासाठी राज्यांच्या सहकार्याने योजना येणार असल्याने महाराष्ट्रात एक हरितक्रांती होऊ शकेल. अनुसूचित जाती जमातींसाठी पादत्राणे आणि चामड्यासाठी उद्योजक म्हणून चांगली संधी निर्माण होणार आहे. चर्मोद्योग योजनेमुळे बावीस लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. मागासवर्गीय महिलांसाठी विशेष योजना आणल्याने हा समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असे मत विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी आज अर्थसंकल्पाबाबत बोलताना मांडले.

ते म्हणाले, “आजवर काँग्रेस अथवा इतर पक्षांच्या सरकारांनी करमर्यादा अतिशय कमी ठेवल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याची झळ बसत होती. मात्र देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यामुळे आज नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. समाजातील सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणात विकास करण्याचे उद्दिष्ट माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ठेवलेले असल्याने हा अर्थसंकल्प लोकांच्या प्रगतीला दिशा देणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात भारतीय भाषांचा विकास आणि आयआयटी संस्था निर्माण होणार असल्याने त्याचबरोबर इंटेलिजन्स वर आधारित संशोधन केंद्रे निर्माण होणार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात 75000 जागा निर्माण होणार असल्याने रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. शहरी विकासाला एक लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्याबरोबरच पायाभूत विकासाला राज्यांना याजमुक्त निधी मिळाल्याने या क्षेत्रात आता मोठे बदल होतील.ज्येष्ठ नागरिकांनाही आता करा मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे.”

सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याने केंद्रीय अर्थमंत्री डॉ. निर्मला सीतारमण यांचे व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आमदार अमित गोरखे यांनी विशेष आभार मानले आहेत.