सर्वधर्म हा गांडूळ विचार असून तो इतिहासाला धरून नाही …

0
303

सांगली, दि. ५ (पीसीबी) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे आपल्या वक्तव्यामुळं नेहमीच चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत, अशा शब्दात संभाजी भिडेंनी राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जहरी टीका केलीय. भिडेंनी सर्वधर्म हा गांडूळ विचार असून तो इतिहासाला धरून नसल्याचं मत व्यक्त केलं. ते बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौड समारोप प्रसंगी बोलत होते. भिडे म्हणाले, ‘सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे, हा सत्य विचार नसून असत्य विचार आहे. हा इतिहासाला धरून विचार नाही, असं मत व्यक्त करत आपल्या मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहिजे आहेत, पण इथेचं बोंब आहे.’

साधी गोष्ट घ्या.. लोक निवडून देतात, ते आमचे खासदार काय? आमदार काय, लोकप्रतिनिधी काय? शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात, भाडोत्री हे बेकार असून आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक आहेत, अशा शब्दांत भिडे गुरुजींनी लोकप्रतिनिधींचा समाचार घेतला. सांगलीत नवरात्रीच्या काळात संभाजी भिडेंच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 35 वर्षांपासून दुर्गामाता दौडीचं आयोजन केलं जातं आहे.