सरोजिनी बाबर चौगुले यांचा वीर जिजामाता पुरस्काराने सन्मान

0
167

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी प्राधिकरण येथे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता पारंपरिक खेळाने सुरू झाली यामध्ये साडे चारशे पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेत विटी दांडू, लगोरी, गोट्या, तिरंदाजी, वूडबॉल, व्हॅलीबॉल खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. मर्दानी खेळाचे अणि योगा च्या विविध प्रकारचे प्रात्यक्षिक झाले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पॅराओलंपिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री श्री मुरलीकांत पेटकर होते. आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू संग्राम चौगुले यांची माता सरोजिनी बाबर चौगुले यांना वीर जिजामाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड मधील 40 शालेय राष्ट्रीय खेळाडू यांच्या मातांना गौरविण्यात आले.

यावेळी क्रीडा भारती चे अखिल भारतीय महामंत्री श्री राजजी चौधरी, तसेच श्री मिलिंद जी डांगे, श्री विजयजी पुरंदरे, डॉ सतीश बोरकर, श्री मनोज देवळेकर, शारीरिक शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री शरदचंद्र धारूरकर हे उपस्थित होते.

आपल्या मनोगतामध्ये श्री राज चौधरी यांनी फिटनेस फॉर ऑल हा मंत्र प्रामुख्याने मांडला तसेच वीर जिजामाता ने छत्रपती शिवाजींना याप्रमाणे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे त्यांनी सर्व मातांना आव्हान केले की आपणही आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे.

अनेक खेळाच्या क्रीडा संघटनांमधील पदाधिकारी राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा वैद्य, मसाजर, फिटनेस ट्रेनर, क्रीडा साहित्य व्यावसायिक, क्रीडा पत्रकार तसेच , खेळाचे क्रीडा केंद्राचे प्रमुख , सहभागी होते

प्रस्तावना पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री श्री चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केली.

सूत्रसंचालन दिनेश कुलकर्णी व राजेंद्र महाजन यांनी केले, मातांच्या पुरस्कारांचे वाचन पिंपरी चिंचवडचे मंत्री श्री जगदीश सोनवणे यांनी केले, आभार प्रदर्शन श्री पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री भगवान सोनवणे यांनी केले

पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष चंद्रकांत पंगारे, मुग्धा सरदेशपांडे, शीतल म्हात्रे, भक्ती थोरात, राजश्री धुरी, संध्या कांबळे, माधवी इनामदार, सोनाली मापुस्कर, सुहास म्हात्रे, उल्हास मापुस्कर, जीवन सोळंके, विकास तेलीगिरी, राजेंद्र पितालिया, अमित थोरात, अनुपम आल्हाट, किरण अडगळे, सचिन वावले , अमरीश नादगती, राहुल कड, सचिन बुचुटे हे क्रीडा भारती सदस्य उपस्थित होते.