सराईत चोरट्याला अटक; सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

0
80

पिंपरी,दि 0 ९ (पीसीबी)

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून चार लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अनिरुथ ऊर्फ अनिरूध्द योगेश नानावत (वय २२, रा. कुसेगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी, निगडी, चिंचवड, चिखली परिसरात झालेल्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पहणी केली. त्यामध्ये एका संशयित व्यक्तीची ओळख पटवून अनिरुथ नानावत याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या दोनच सहकाऱ्यांसोबत मिळून पिंपरी, चिंचवड, चिखली व निगडी परीसरात सोनसाखळी चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी एक दुचाकी, सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी, निगडी, चिंचवड, चिखली पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

अनिरुथ नानावत याच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात एक आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहूल खारगे, प्रविण कांबळे, नितीन लोखंडे, विशाल गायकवाड, सोमनाथ मोरे, नितीन उम्रजकर, प्रशांत पाटील, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमीत देवकर, चंद्रकांत गडदे, बाबाराजे मुंडे, हर्षल कदम व अमर कदम यांनी केली आहे.