सराईत गुन्हेगाराकडून रिक्षा चालकाला कोयत्याने मारहाण, आरोपीला अटक

0
610

आकुर्डी, दि. 8 (पीसीबी):- सराईत गुन्हेगाराने एका रिक्षा चालकाला रस्त्यात अडवून कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. ६) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास आकुर्डी येथे घडली.

वीरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय २५, रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सागर बाळकृष्ण पांढरकर (वय ३८, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या घरातील लोकांना माझ्या बद्दल खोटं सांगतो काय, असे म्हणून वीरेंद्र याने पांढरकर यांच्या डोक्यात पाठीमागे दगडाने मारले. तसेच तोंडावर, कपाळावर आणि नाकावर कोयत्याने मारून त्यांना गंभीर जखमी केले. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. रिक्षाची तोडफोड करून रिक्षाचेही नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.