सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सव मंडळांचा मंगलमूर्ती पुरस्काराने सन्मान

0
62

डीजे’वर गणेशोत्सव मंडळानी मार्ग काढावा : आमदार सुनील शेळके

तळेगाव दाभाडे, दि. 21 आज गणेशोत्सवाचे स्वरूप पालटले आहे. अलीकडच्या काळात गणेशोत्सवाला नाविन्यपूर्ण महत्त्व आल्याचे पाहायला मिळते. यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही उल्लेखनीय गोष्ट आहे. डीजे’मुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे आगामी काळात यावर मार्ग कसा काढता येईल, याचा विचार गणेश मंडळांनी करावा, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले. दरम्यान, डोळसनाथ कॉलनीतील डोळसनाथ मित्र मंडळाला प्रथम क्रमांकाचा मंगलमूर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान, मावळ यांच्यावतीने गणेशोत्सवात गणपती मंडळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी सायंकाळी नाना नानी पार्क येथे संपन्न झाला. या स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट मुर्तिकार पुरस्कार, गो.नि. दांडेकर पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, उत्कृष्ट ढोल ताशा पुरस्कार; तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सन्मान, स्थीर देखावे विभाग पुरस्कार, हलता देखावा विभाग पुरस्कार, विद्युत रोषनाई विभाग पुरस्कार, जिवंत देखावा विभाग पुरस्कार देऊन मंडळांना, मंडळाच्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आमदार सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी सत्यशीलराजे दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव शहर महिला अध्यक्षा शैलजा काळोखे, माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, माजी तहसीलदार रामभाऊ माने, समाजभूषण अण्णासाहेब दाभाडे, माजी नगरसेवक निखिल भगत, संजय बाविस्कर, सौरभ चिंचवडे, माजी नगरसेविका शोभाताई भेगडे, रजनी ठाकूर, माजी नगराध्यक्ष नाना करके आदींसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके यांनी पूर्वीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, की पूर्वी गणेशोत्सव आला की सर्व सवंगड्यांसोबत मंडपासाठी खड्डे खोदणे, मंडप उभारणे, वर्गणी गोळा करणे अशा गमती जमती असायच्या. सण साजरा करताना पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी जबाबदारी घेतात. त्यामुळे सामाजिक सलोखा जपला जातो. गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देणारा असा कार्यक्रम दरवर्षी सुरू राहिला पाहिजे. संतोष दाभाडे यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवो, ही गणेश चरणी प्रार्थना, असेही आमदार शेळके म्हणाले.
सुनील रासने यांनी विजेत्या गणेशोत्सव मंडळांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या व चांगले देखावे साकारल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दरवर्षी असाच कार्यक्रम संपन्न व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गणेश खांडगे म्हणाले, पूर्वीचा गणेशोत्सव व सध्याचा गणेशोत्सव यामध्ये कमालीचा फरक आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे, ही तळेगावची परंपरा आहे. ती यंदाही जपली याचे समाधान वाटते. सांस्कृतिक आदान प्रदान तळेगावने कायमच जपले आहे.
प्रास्ताविकात संतोष दाभाडे यांनी सांगितले, की आज समाजपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे. त्याला तळेगाव दाभाडेमधून चांगला प्रतिसाद मिळाला. तळेगाव नगरपरिषदेत सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धारही करण्यात येणार आहे.
प्रकाश ओसवाल म्हणाले, की सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रात प्रतिष्ठानने उल्लेखनीय काम केले आहे. तळेगावची ओळख ही सरसेनापती उमाबाई दाभाडे अशी आहे. त्यामुळे त्यांचे भव्य स्मारक व्हावे, तसेच समाधीस्थळ विकसित व्हावे अशी अपेक्षा आहे.

सूत्रसंचालन ‌ऍड. विनय चंद्रकांत दाभाडे यांनी, तर आभार आनंद दाभाडे यांनी मानले.

  • हलता देखावा विभाग : प्रथग कमांक : मुरलीधर मित्र मंडळ खळदे आळी,
    उत्कृष्ट मुर्तीकार : दिनेश भिकोले
    व्दितीय कमांक : आझाद मित्र मंडळ भोई आळी
    देखावा : छत्रपती शासन
    विशेष सत्कार – घरगुती हलता देखावा (रोहण थोपटे, विशाल रेसिडेन्सी)
    विशेष सत्कार – मंगेश साळुंखे

विशेष साकार- विशाल रेसिडेन्सी

  • स्थीर देखावा विभाग :
    १. प्रथम क्रमांक : फेंडस क्लब मित्र मंडळ तेली आळी
    देखावा : हरीश्चंद्र गड गुहा
    २. व्दितीय क्रमांक : राजा शिवछत्रपती मित्र मंडळ ट्रस्ट भेगडे आळी
    देखावा : साडेतीन शक्तीपीठे
    ३. तृतीय क्रमांक : श्रीनगरी मित्र मंडळ

देखावा : नृसिंह अवतार

विद्युत रोषताई विभाग
१. प्रथम क्रमांक : अष्टविनायक मित्र मंडळ सुभाष चौक
२. व्दितीय कंमाक : मारूती चौक मित्र मंडळ मारूती मंदीर
उत्कृष्ठ मंडप सजावट विभाग :

कैकाडी समाज मंदिर मित्र मंडळ कैकाडी आळी

जिवंत देखावा विभाग :
१. प्रथम कंमाक – भेगडे तालीम मित्र मंडळ भेगडे आळी
देखावा : धर्मवीर शंभुराजे
२. व्दितीय कंमाक :
अ. जिजामाता चौक मित्र मंडळ जिजामाता चौक
देखावा : स्वराज्य निष्ठेची पावनखिंड
ब. शाळा चौक मित्र मंडळ शाळा चौक
देखावा : गोंद्या आला रे…
३. तृतीय कमांक :
अ. शेतकरी तरून मंडळ
देखावा : गरूडझेप
ब. हिंदुराज मित्र मंडळ
देखावा : अर्थसाक्षरता

  • उत्तेजनार्थ सामजिक जनजागृती विभाग
    १. डोळसनाथ तालीम मंडळ
    देखावा : तळेगाव नगरीच्या एतिहासीक पाउलखुना
    २. राजा शिव छत्रपती मित्र मंडळ
    देखावा : संत तुकोबाची विठ्ठलभक्ती
  • बाल कलावंत विभाग: शिवकांती मित्र मंडळ
    उत्कृष्ठ संहिता व उत्कृष्ठ ध्वनीमुद्रन – सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ
  • गो. नी. दांडेकर पुरस्कार :
  • उत्कृष्ठ कलाकार पुरूष विभाग : संजय केसकरमी
    भूमिका : औरंगजेब देखावा : धर्मवीर शंभुराजे
  • उत्कृष्ठ कलाकार महिला विभाग : धनश्री मिननाथ दाभाडे
    भूमिका : ऊमाबाईसाहेब दाभाडे देखावा : तळेगाव नगरीच्या एतिहासिक पाऊलखुणा
  • उत्कृष्ट लोकप्रिय भूमिका : कु. काव्यश्री विनय दाभाडे

भूमिका : बाल शंभुराजे देखावा : धर्मवीर शंभुराजे

  • विशेष सत्कार :
    १. डोळसनाथ तालीम मंडळ
    २. कालीका मित्र मंडळ
    ३. तिलवन तेली समाज मित्र मंडळ
    ४. राजेंद्र चौक सावर्जनिक गणेशोत्सव मंडळ
    ५. गणेश तरूण मंडळ
  • विशेष सत्कार : मिरवणूक चित्ररथ विभाग :
    १. राष्ट्रतेज तरूण मित्र मंडळ साने आळी
    २. सामाजिक संदेश : जय भवानी तरूण मंडळ दाभाडे आळी

विशेष सत्कार : सुवर्ण महोत्सवी मंडळे
१. जय बजरंग मित्र मंडळ ढोरवाडा
२. राष्ट्रतेज मित्र मंडळ साने आळी
३. विशाल मित्र मंडळ
४. शिवशंकर मित्र मंडळ
५. वीरचक्र मित्र मंडळ
६. वरद विनायक मित्र मंडळ तळेगाव स्टेशन (२५ वे वर्ष)

७. पाच पांडव मित्र मंडळ

  • ढोल ताशा लेझीम विभाग पुरस्कार :
  • उत्कृष्ट ढोल ताशा पुरस्कार : सिध्दगणेश पथक गणेश तरूण मंडळ
  • उत्कृष्ट ताशा वादक : पारंपरिक विभाग: अभी भेगडे, डोळसनाथ तालीम मंडळ
  • उत्कृष्ट ताशा वादक : पथक विभाग: आकाश गरूड, मानवंदना ढोल ताशा पथक
  • उत्कृष्ट ताशा वादक : महिला विभाग : सविता मालकर, वज्र ढोल ताशा पथक
  • उत्कृष्ट ढोल वादक : पुरुष विभाग : राहुल जाधव, संताजी प्रतिष्ठान पथक
  • उत्कृष्ट ढोल वादक : महिला विभाग: समृध्दी आपटे, सिध्दगणेश पथक
  • उत्कृष्ट ध्वजधारक : पुरुष विभाग: मोहिते, मानवंदना पथक
  • उत्कृष्ट ध्वजधारक : महिला विभाग : प्रांजल पांचोली
  • उत्कृष्ट टोल वादक : सिध्दु जाधव
  • ढोल ताशा वादन सेवा पुरस्कार
    १. डोळसनाथ कॉलनी मित्र मंडळ
    २. चावडी चौक मित्र मंडळ
    ३. मावळगर्जना मित्र मंडळ
    ४. शिवराष्ट्र मित्र मंडळ
    ५. शिवशक्ती मित्र मंडळ माळवाडी
    ६. गुरू आदेश ढोल पथक
    ७. मानवंदना ढोल ताशा पथक
    ८. वज्र ढोल ताशा पथक
    ९. संताजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक
    १०. डोळसनाथ तालीम मंडळ
    ११. सिद्धगणेश गणेश मंडळ