सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या त्या विधानावर वादळ

0
8
  • आता संरसंघचालकांना रिटायर करण्याची गरज, सोशल मीडियातून प्रतिक्रीया

प्रयागराज, दि.25 (पीसीबी) : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशात मंदिर-मशीद वाद वाढवण्याच्या घटनांबद्दल नुकत्याच केलेल्या विधानावर उत्तर प्रदेशातील साधूसंतांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही साधूंनी मंदिरांवर पुन्हा दावा केला पाहिजे अशी भूमिका मांडली तर काहींनी घटनात्मक चौकटींच्या अधीन राहूनच असे प्रश्न सोडवले पाहिजेत. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्वेतेश्वरानंद यांनी मोहन भागवत यांच्या भूमिकेचा अत्यंत कठोर शब्दांत समाचार घेतला आणि त्याच पोस्टमध्ये भागवत यांची रिटायरमेंट गरजेची असल्याचे मत शेकड स्वयंसेवकांनी मांडल्याचे दिसले.

डॉ. भागवत अलिकडे एका भाषणामध्ये वाढत्या मंदिर-मशीद वादावर चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, काही व्यक्तींना असे वाटते की अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर धार्मिक स्थळांवर नवीन वाद उपस्थित करून स्वत:ला हिंदू नेते म्हणवून घेता येईल. त्यांच्या या टिप्पणीवर अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी ऐतिहासिक मंदिरांच्या जागांवर पुन्हा दावा करण्यासाठी निर्णायक कृती करण्याची गरज आहे. दास हे १ मार्च १९९२पासून राम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत.

दुसरीकडे, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सरसंघचालकांच्या राष्ट्रीय सौहार्द कायम राखण्यासंबंधी व्यापक दृष्टीकोनाला पाठिंबा दिला आहे. भारत सध्या आणखी अंतर्गत संघर्ष सहन करण्याच्या परिस्थितीत नाही असे सरस्वती म्हणाले. गेल्या वर्षभरात देशातील वाराणसी, मथुरा, संभल, भोजपूर, अजमेर अशा विविध ठिकाणच्या मुस्लीम धार्मिक स्थळांवर दावा करणाऱ्या याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत.

आपण भागवत यांच्या विधानाचे महत्त्व ओळखले पाहिजे. धार्मिक आणि राष्ट्रीय प्रश्न घटनात्मक चौकटीतच सोडवले पाहिजे, आपल्या देशाला पुन्हा नागरी युद्धसदृश्य परिस्थिती परवडणार नाही, असे मत अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी मांडले आहे.

हिंदूंचे विस्थापन करून मंदिरे ताब्यात घेण्यात आली होती असे तपासात आढळले तर त्यांच्यावर पुन्हा दावा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा ठिकाणांची ओळख पटवण्याचा आणि पूजा पुन्हा सुरू करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टीकोन योग्य आहे, असे राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे.

ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी संघ प्रमुख मोहन भागवत यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे ज्यात त्यांनी म्हटले होते की सर्वत्र मंदिरे शोधण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, यापूर्वी हिंदू समाजावर अनेक अत्याचार झाले असून हिंदूंची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आता हिंदू समाजाला आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि जतन करायचा असेल तर त्यात गैर काय? अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, आक्रमणकर्त्यांनी भूतकाळात उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची यादी तयार करावी आणि ASI मार्फत त्यांचे सर्वेक्षण करावे.

अविमुक्तेश्वरानंद यांनी डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या राजकीय लढ्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, संसदेतील गोंधळाचे कारण अमित शहा यांनी संसदेत आंबेडकरांबाबत केलेले वक्तव्य होते. आंबेडकरांच्या नावाने आपल्याला त्रास होत असल्याचेही ते म्हणाले की, देशात आंबेडकरांच्या विचारधारेला अनुसरणारे लोक जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या राजकारणासाठी आंबेडकरांच्या नावाचा वापर करत आहे.

अविमुक्तेश्वरानंद यांनी बांगलादेशातील हिंसाचाराचा केला निषेध –
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करत शंकराचार्य म्हणाले की, भारतात बेकायदेशीरपणे स्थलांतरित होणाऱ्या ८ कोटी बांगलादेशींवर केंद्र सरकारने कठोर पावले उचलून त्यांना बांगलादेशात परत पाठवावे. जेव्हा 8 कोटी बांगलादेशी त्यांच्या देशात परत जातील, तेव्हा त्यांच्या ओझ्यामुळे बांगलादेशचा अंत होईल. उल्लेखनीय आहे की ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हरिद्वार दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी सामना करताना वरील गोष्टी सांगितल्या.