नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात शपथ घेतली. देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास आज रचला गेला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली.
यावेळी त्या पहिलं अभिभाषण करताना भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो व पूर्णही करु शकतो अशी त्यांनी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. मावळते राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर सव्वा दहा वाजेच्या सुमारास देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रि परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते.
द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृत कालामध्ये वेगाने काम करावे लागेल. या 25 वर्षांत अमृतकाल प्राप्तीचा मार्ग दोन मार्गांवर पुढे जाईल – प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य आहे.