सरकार कोसळणार, सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी

0
491

मुंंबई, दि. २२ (पीसीबी) : एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असं चित्र निर्माण होताना दिसतंय. अशातच भाजपाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काल रात्रीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झालेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर आज सकाळपासूनच आमदार आणि नेत्यांची रांग लागलेली पहायला मिळाली.

अपक्ष आमदारही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
आमदार प्रवीण दरेकर, आशिष शेलार, जयकुमार रावल, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, कालिदास कोळंबकर, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार यांनी सागर बंगल्यावर येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर अपक्ष आमदार गीता जैन यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

साऱ्या घडामोडींवर भाजपा लक्ष ठेवून आहे. त्यानंतरच भाजपा आपली खेळी खेळणार आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर सत्ता स्थापनेचा दावा करायचा असल्यास आकड्यांची जुळवाजुळव करण्याबाबत आता भाजपच्या गोटात खलबत सुरू आहेत. यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला हे सत्ता स्थापन करण्यासाठीचं केंद्र बनलं आहे.