समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी महामृत्यूंजय जप केल्याबद्दल गुन्हा दाखल करणे निषेधार्ह !

0
393

समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणारा ‘जादूटोणा विरोधी कायदा’ रहित करा ! – हिंदु जनजागृती समिती  

पुणे, दि. २९ (पीसीबी) – समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे; मात्रसमाजहित लक्षात घेता हे अपघातहोऊ नयेत,यासाठीदिंडोरी (नाशिक)येथीलश्री स्वामी समर्थ संप्रदायाच्यावतीने सव्वा कोटी महामृत्यूंजयमंत्रजप करण्यातआला.यावरमहाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे डॉ.हमीददाभोळकर यांनी केलेल्यातक्रारीनुसार ‘जादूटोणाविरोधी कायद्या’च्या आधारेबुलढाणा पोलिसांनी गुन्हादाखल केला आहे.सद्हेतूनेसमाजहितासाठी केलेल्या धार्मिककृतीला गुन्हा ठरवणे,हासरळसरळ जादूटोणा कायद्याचादुरूपयोग आहे.हाकायदा अंधश्रद्धांचे नव्हे,तरहिंदूंच्या धर्मश्रद्धांचेनिर्मूलन करणारा आहे,हेचआज या गुन्ह्यातून सिद्ध झालेआहे.यासाठीचआम्ही रस्त्यावर उतरून याकायद्याच्या विरोधात शेकडोआंदोलने केली होती.उद्याजर कोणी विश्वकल्याणार्थयज्ञयाग केला,तरत्यांच्यावरही गुन्हा दाखलकरण्याची मागणी ‘अंनिस’कडूनकेली जाईल आणि असे गुन्हे दाखलकरून धार्मिक कृत्यांवरगंडांतर आणले जाईल.त्यामुळेहिंदूंच्या धार्मिक कृत्यांवरगदा आणणारा आणि श्रद्धेवरआघात करणारा हा काळा कायदाचरद्द करण्यात यावा,अशीमागणी हिंदु जनजागृती समितीचेमहाराष्ट्र आणि छत्तीसगडराज्य संघटक श्री.सुनीलघनवट यांनी केली.यासाठीलवकरच मुख्यमंत्र्यांनाभेटणार असल्याचेही श्री.घनवटयांनी म्हटले.

  श्री.घनवटपुढे म्हणाले की,जादूटोणाविरोधीकायदा हा हिंदु धर्माच्याविरोधातच आहे.जरहा कायदा केवळ फसवणूक,आर्थिकलुबाडणूक वा अत्याचाराच्याविरोधात आहे;तरसमृद्धी महामार्गावरील अपघातरोखावेत,जनतेचाजीव वाचावा,यासद्हेतुने स्वत:च्याखर्चाने कोणी प्रार्थना,पूजा,मंत्रजपआदी करत असेल,तरत्यात गैर काय आहे ?यातकोणता अपराध आहे ?यातूनकुठे कायदा-सुव्यवस्थेलाबाधा निर्माण झाली ?याचेउत्तर अंधश्रद्धा निर्मूलनसमितीवाले आणि त्यांच्यादबावामुळे हा गुन्हा दाखलकरणार्‍या पोलिसांनी हिंदुसमाजाला द्यायला हवे !
       
      स्वत:मुख्यमंत्रीआणि उपमुख्यमंत्री दरवर्षीआषाढी अन् कार्तिकी वारीलाश्री पांडुरंगाच्या चरणी‘बळीराजा सुखी होऊ दे,चांगलेपीक येऊन,दुष्काळवा नैसर्गिक आपत्ती दूर होऊदे’ म्हणून पूजा करतात.मगत्या पूजेवरही अंनिसवालेगुन्हा दाखल करण्याची मागणी करणार का ?अनेकमंत्री निवासस्थानी वा त्यांच्याकार्यालयात ‘शुभ कार्य व्हावे,अडथळेदूर व्हावेत’ म्हणून श्रीसत्यनारायण पूजा करतात.त्यांच्यावरहीअंनिसवाले गुन्हा करणार का?जनतेच्यारक्षणासाठी प्रार्थनाकरणार्‍यांवर गुन्हा नोंदवूनजनहित कसे साध्य होऊ शकते ?हिंदुधर्मावर आघात करण्यासाठी हाकायदा एक हत्यार म्हणून वापरलेजात आहेत.एड्स,कॅन्सरयांसारखे अनेक असाध्य रोगबरा करण्याचा दावा करून जनतेचीखर्‍या अर्थाने फसवणूक करणार्‍याख्रिस्ती मिशनर्‍यांच्याकार्यक्रमावर गुन्हा दाखलकरण्यासाठी अंनिसवाल्यांनीकधीही पुढाकार घेतला नाही;मात्रयेथे महामृत्यूंजय जप केल्यावरगुन्हा दाखल केला,यातूनचयांचा हिंदु धर्मविरोधी चेहरादिसून येतो.सरकारनेअंनिसवाल्यांचे हे षड्यंत्रहाणून पाडण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा रहित करावा,असेश्री.घनवटयांनी म्हटले आहे.