- षडयंत्रामागील मागील नेमके सत्य काय?
- सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड चे आयोजन
- भगवा म्हणजे त्याग, शौर्य आणि संस्कृती
चिंचवड | दि.१० (पीसीबी) : भगवा कधीही आतंकवादाचं प्रतिक नव्हताच, भगवा म्हणजे त्याग, शौर्य आणि संस्कृतीचे प्रतीक असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व निरपराध हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची माननीय न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केल्यानंतर पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब झाले.
१७ वर्षाच्या न्यायालयातील या प्रदीर्घ लढाईनंतर खोट्या आरोपांखाली ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगला त्यापैकी चिंचवड येथील समीर कुलकर्णी यांची देखील त्यांच्या सहकाऱ्यां समवेत निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणी तथाकथित भगवा आतंकवादामागचे षडयंत्र काय? हिंदूंना आतंकवादी ठरवायचे पाप कोणी केले? या संदर्भातील सत्य व गौप्यस्फोट समीर कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीतून समोर येणार आहे. मंगळवार दि.१२ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता जेष्ठ पत्रकार, विश्लेषक अॅनेलायझर न्यूजचे संपादक सुशील कुलकर्णी व इतिहास संशोधक डॉ.श्रमिक गोजमगुंडे समीर कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या षडयंत्रामागील नेमके सत्य व निरपराध हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा संघर्ष जाणून घेण्यासाठी सदर मुलाखत कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड चे वतीने करण्यात आले आहे.