समलैंगिक विवाहांबाबत समाजाचा दृष्टिकोन पारंपारीकच -८३.९ टक्के नागरिकांना वाटते चिंता

0
243

पुणे, दि.९ (पीसीबी) समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याच्या विषयावर देशातील सर्वात मोठे सर्वेक्षण पुण्यातील दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने केले आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. समलैंगिक विवाहांबाबत समाजमन जाणून घेणे आणि या विषयावर समाजात प्रचलित असलेले मत जाणून घेणे, हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे.

या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, वैयक्तिक पातळीवर समलैंगिक विवाहांचा स्वीकार करण्याबाबत बहुतांश व्यक्तींचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास समाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती बहुसंख्य व्यक्तींना वाटत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ८३.९ टक्के लोकांनी समलैंगिक विवाह हा भारतात चिंताजनक विषय असल्याचे म्हटले आहे, तर केवळ १६.१ टक्के लोकांनी हा विषय गंभीर नसल्याचे म्हटले आहे.