दि.११(पीसीबी)-समतावादी वारकरी संप्रदायामध्ये विषमतावादी धर्मांधशक्तींचा शिरकाव झाला आहे. हे सत्य आदरणीय शरद पवार साहेबांनी अधोरेखित करतात भारतीय जनता पक्षाच्या पिलावळी बीळातून बाहेर येत पवार साहेबांवर गरळ ओकू लागल्या आहेत.
मात्र संपूर्ण महाराष्ट्राला हे माहिती आहे की तात्कालीन सनातनी, विषमतावादी, प्रतिगामी धर्मांधशक्तीच्या विरोधातच वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला आहे. संत ज्ञानेश्वरांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांपर्यंत तात्कालीन सर्वच संतांना विषमतावादी धर्मांधशक्तींनी त्रास दिला आहे आणि आत्ता सुद्धा या धर्मांधशक्ती वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करत आहे हे सत्य शरद पवार साहेबांनी सांगितले.
मात्र प्रत्येक गोष्ट हिंदू मुस्लिम वादाकडेच नेण्याची भारतीय जनता पक्षाला सवय आहे. जाळीदार टोप्या आणि इतर पार्ट्यांचा उल्लेख करणारा तुषार भोसलेला फडणवीस यांनी असंख्य वेळा केलेल्या इफ्तार पार्ट्यांचा आणि घातलेल्या जाळीदार टोप्यांचा विसर पडला आहे. आधुनिक महाराष्ट्रात वारकऱ्यांवर लाठी हल्ला करणारे देवेंद्र फडणवीस हे आधुनिक मंबाजी भट आणि अनाजीपंत आहेत हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे.
सुनिल गव्हाणे
प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार









































