समजावण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार

0
241

चिखली, दि. २ (पीसीबी)- मित्रा सोबत होत असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या मित्राला तिघांनी कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि.31) म्हेत्रेवस्ती ,चिखली येथे घडली आहे.

याप्रकऱणी दानिश वाजीद शेख (वय 24 रा.निगडी) यांनी चिखली पोलीस टाण्यात फिर्य़ाद दिली आहे. फिर्यादीवरून निलेश रेणवा (चिखली) वत्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपीचा भाऊ दिनेश यांच्या दोन महिन्यापुर्वी भांडणे झाली होती. याच रागातून आरोपी हे फिर्यादीचे मित्र अमित सिंग यांना मारहाण करत होते. यावेळी फिर्यादी हे समजावण्यास गेले असता आरोपीने जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.