पिंपरी,दि.६(पीसीबी) – पुणे येथील सप्तर्षी फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षांपासून एक अत्यंत ज्वलंत व सामाजिक विषयावर काम करीत आहे तसेचपोलिस यंत्रणेला सहयोग करीत आहेत. बेवारस मृत बांधवांचे नातेवाईक शोधणे आणि ते न मिळाल्यास सदर बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणे या स्वरूपाचे एक महत्वाचे सामाजिक कार्य ही संस्था करीत आहे. दिनांक २० मे २०२२ ते १ जून २०२२ या कालावधीत संस्थेने ३ बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केलेले आहे. दिनांक २० मे २०२२ रोजी वाकड पोलिस स्टेशन हद्दीमधील एक तर दिनांक २७ मे आणि १ जून २०२२ रोजी रावेत पोलिस चौकी हद्दीमधील दोन बेवारस मृतदेहांचे अंतिम संस्कार करण्यात आले आहे. या वेळी वाकड पोलिस स्टेशन मधील पोलिस उपनिरीक्षक श्री.मसाळ साहेब तसेच एस.व्ही.महाजन साहेब तर रावेत पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक एस.एम.गावडे साहेब व गणेश गोफणे साहेब यांच्या सहकार्याने अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक सचिव श्री. मनोजकुमार बोरसे, संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. जीवन साळवे, संस्थेचे प्रतिनिधि श्री. सचिन सोसले, श्री.साहिल ठोंबरे, श्री.भूषण गायकवाड आदि उपस्थित होते. श्री. सुरेश भोंगले सर प्रत्येक वेळी संस्थेच्या या उपक्रमासाठी अॅम्ब्युलेन्स उपलब्ध करून देतात. श्री.रनपिसे नेहमी अंत्यसंस्कारसाठी पुष्पहार मोफत उपलब्ध करून देतात तसेच वाय.सी.एम रुग्णालय सर्व डॉक्टर व कर्मचारी, लिंक रोड चिंचवड स्मशान भूमीचे श्री. कांबळे ,श्री.पंडित ,श्री.आपटे , श्री. साबळे , श्री. बर्डे , श्री.रुपटक्के, शुभम डांगे, श्री.विनोद नेहमीच या उपक्रमास सहयोग देतात. आज पर्यंत संस्थेने कोणत्याही शासकीय अर्थसहाय्य शिवाय ५०० पेक्षा अधिक अंत्यसंस्कार स्वखर्चाने केलेले आहेत.
बेवारस मृतदेह आणि त्यांचे नातेवाईक शोधणे ही एक अत्यंत अशक्यप्राय झाले आहे व हा एक मोठा सामाजिक विषय म्हणून पुढे आलेला आहे. बेवारस मृत व्यक्तींचे नातेवाईक शोधण्यासाठी सप्तर्षी फाउंडेशन करणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर की, जेणेकरून बेपत्ता व्यक्तींची नोंद आणि बेवारस मृतदेह यांची सांगड घालण्याचे प्रयत्न सप्तर्षी फाउंडेशन कडून केला जाणार आहे. यासाठी कॉल सेंटर ,मोबाइल एप्लीकेशन आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश या त्रिसुत्रीद्वारे अभियानाची उभारणी केली जाणार आहे. सामाजिक बांधिलकी असलेल्या नागरिकांना सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी व्यासपीठ या अभियानाद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदर संकल्प व प्रकल्प पूर्णकरण्यासाठी संस्था शहर पोलिस प्रशासन तसेच राज्याच्या गृह विभागासोबत पाठपुरावा करणार आहे. यामुळे बेवारस मृत व्यक्तींचे नातेवाईक शोधण्यास मदत होऊ शकणार आहे व पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मोठा हातभार लागणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव श्री. मनोजकुमार बोरसे यांनी दिली.
धोरणात्मक बाब म्हणून बेवारस मृत व्यक्ति, रस्त्यावरील मनोरुग्ण आणि हरवलेली लहान बालके यांचा शोध घेण्यासाठी आधार यंत्रणा म्हणजेच यू.आय.डि.ए.आय (UIDAI) व केंद्र शासनासोबत पाठपुरावा करण्याचा सप्तर्षी फाउंडेशनचा संकल्प आहे. यादृष्टिकोनातून आधार यंत्रणेतील मुंबई विभागीय कार्यालयास या पूर्वी दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी पत्र देण्यात आले आहे.
सप्तर्षी स्वर्ग संस्कार अभियानासाठी संस्थेस कोणत्याही प्रकारची शासकीय अनुदान तसेच कोणत्याही प्रकारचा सी.एस.आर निधी आज पर्यंत मिळालेला नाही. सप्तर्षी फाउंडेशन स्वखर्चाने हे अभियान राबवत आहे. येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी लाखो रुपयांची आवश्यकता असणार आहे यासाठी समाजातील दानशून व्यक्ति, संस्था आणि कंपनीने सढळ हाताने मदत करून सप्तर्षी फाउंडेशन ला हातभार लावून अभियानाची व्याप्ती वाढवावी व बेवारस मृतदेह बेवारस न राहता त्यांच्या नातवाईक पर्यंत पोहोचावा हे ध्येय साध्य करण्यास मदत करावी असे आवाहन श्री. मनोजकुमार बोरसे यांनी यावेळी केले. संस्थेला मदत करण्यासाठी ९७६२१८४५५४ / ९६६५३६३१७७ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सप्तर्षी फाउंडेशन, c/o सिटीझन फर्स्ट ,ऑफिस नं १०४ पहिला मजला , रेनबो प्लाझा , शिवार चौक, रहाटणी पुणे ४११०१७ याठिकाणी संस्थेच्या ऑफिसला भेट द्यावी.