सन्मान पिंपरी चिंचवड शहराच्या प्रगतीचा…

0
6

‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना प्रदान…..

मुंबई, दि. २० पीसीबी –लोकमतच्या वतीने दिला जाणाऱ्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या ‘प्रॉमिसिंग आयएएस’ या श्रेणीतील पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रशासनात कोणतेही काम एकट्याने होत नाही.हा पुरस्कार म्हणजे रामटेक, गडचिरोली, सिंधुदुर्ग, सातारा आणि आता पीसीएमसी येथे मला मिळालेल्या कामाच्या संधी सोबतच या संपूर्ण कार्यकाळात नागरिक व सहकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तम सहकार्याचा आणि संघभावनेचा सन्मान आहे. माझ्या पहिल्या नियुक्तीपासून आजपर्यंत मिळालेल्या जनतेच्या, लोकप्रतिनिधींच्या आणि सहका-यांच्या साथ आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झाले.

माझा ठाम विश्वास आहे की सार्वजनिक सेवेतील उत्तम काम सहकार्यानेच शक्य आहे.सरकार, समाज, आणि संचार या घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणत्याही एकट्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे सर्व ज्ञान आणि ताकद नसते,ती एकत्रित करावी लागते. प्रत्येक पुरस्कार ही केवळ सन्मानाची बाब नसून, व्यापक हितासाठी अधिक चांगले करण्याची जबाबदारीही वाढवतो-आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सक्षम आणि कर्तव्यदक्ष टीमचे नेतृत्व करण्याचा अभिमान वाटतो.मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकांचा सन्मान असल्याची भावना यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केली…