सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील 2 शाळांना सनातनच्या ग्रंथांचे विनामूल्य वितरण !

0
161

आदर्श पिढी घडवण्याच्या दृष्टीने सनातन संस्थेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे शिक्षकांचे मत !

पुणे , दि. २9 (पीसीबी)– ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते. या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने 26 फेब्रुवारी या दिवशी विमलाबाई गरवारे शाळा व कनिष्ठ महाविद्यालय डेक्कन पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी सनातन संस्था व श्री राहुल पुरंदरे यांच्या संयुक्त विद्यमाने सनातनचे 32 मोठे व 7 लघुग्रंथ भेट देण्यात आले.

यामध्ये ‘अभ्यास कसा करावा’, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’, ‘गुण जोपासा’, ‘टीव्ही मोबाईल इंटरनेटचे दुष्परिणाम’ अशा प्रकारचे व इतरही अनेक प्रकारचे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या दृष्टीने उपयुक्त अशा ग्रंथांचा समावेश आहे.
मुलांचा गुणात्मक तसेच सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने तसेच आदर्श पिढी घडवण्याच्या दृष्टीने हे ग्रंथ अतिशय उपयुक्त आहेत असे मत शाळेतील सर्व शिक्षकांनी व्यक्त करून संस्थेच्या या ग्रंथभेट उपक्रमाचे कौतुक केले.