चिंचवड (जिल्हा पुणे) – प्रत्येकाला आयुष्यात सातत्याने मिळणाऱ्या सुखाची अपेक्षा असते.आणि सातत्याने मिळणाऱ्या सुखाला अध्यात्मात “आनंद” असे म्हणतात. आनंदप्राप्ती हेच मनुष्याचे ध्येय आहे आणि ते मिळवायचे असेल तर साधनेला पर्याय नाही. आजकाल धकाधकीच्या आयुष्यामध्ये तणावविरहित आयुष्य जगण्यासाठी नाम साधना आवश्यक आहे असे प्रतिपादन भूलतज्ञ आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी केले. त्या सनातन संस्थेतर्फे आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर सप्तर्षी रेसिडेन्सी येथील जाहीर प्रवचनात मार्गदर्शन करत होत्या. या प्रवचनाला 100 हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
साधना प्रवचन झाल्यानंतर उपस्थितांनी त्यांच्या शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले. व मार्गदर्शन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सप्तर्षी सोसायटीचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांनी भूलतज्ञ आधुनिक वैद्या ज्योती काळे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.माधवी बोरसे यांनी केले. प्रवचनस्थळी क्रांतिकारकांचे माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी जिज्ञासूंनी बालसंस्कार वर्ग सुरू करण्याची मागणी केली.