सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे

0
267

मुंबई , दि. १३ (पीसीबी) – राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भाजपकडून एकूण सहा उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. मात्र, आता भाजप समर्थक सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला डमी अर्ज मागे घेतला आहे. तर काँग्रेसही आपला दुसरा उमेदवार मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय