सत्यशोधक विवाहमध्ये मानवी समानता, स्वातंत्र्य, व स्रीचा आदर असतो –सत्यशोधक ढोक

0
59

भारताच्या अमृत महोसत्वी-संविधानदिनी सत्यशोधक पध्द्तीने उच्चशिक्षित शिंदे आणि हंकारे झाले सांगलीमध्ये विवाहबद्द !!!

फुले एज्युकेशन तर्फे 49 वा मोफत सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला.

सांगली, दि. 27 (पीसीबी) : भारताच्या अमृत महोसत्वी – संविधान दिनी फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे उच्चशिक्षित सत्यशोधक देवेंद्र बाबासो शिंदे B.Arch. आणि सत्यशोधिका भाग्यश्री राजाराम हंकारे,BE.Comp. यांचा मोफत 49 वा सत्यशोधक विवाह सोहळा, सत्यशोधक समाज स्थापना दिनास 151 वर्ष पूर्ण झाले म्हणून मंगळवार दि.26 नोव्हेंबर 2024 रोजी दु.1 वा. सांगली, माधवनगर हुपरी गार्डनमध्ये संस्थेचे वतीने पहिला सत्यशोधक विवाह सोहळा अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सामुहिक संविधान उद्देशिकाचे वाचन करीत शानदार पणे पार पडला.

याप्रसंगी प्रा.सुदाम धाडगे म्हणाले की महात्मा फुले यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी आणि स्वाभिमानासाठी सत्यशोधक विवाह पद्धतीतून कन्यादान ही स्त्रीविरोधी आणि कालबाह्य संकल्पना नाकारून एक प्रगत व आधुनिक दृष्टिकोन मांडत एक आदर्श विवाह पद्धत सोबत इतर सत्यशोधक विधीची माहिती सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात दिल्याचे सांगितले.

यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की सत्यशोधक विवाहामध्ये मानवी समानता, स्वातंत्र्य, आणि स्त्रीचा आदर या तत्त्वांचा समावेश असतो. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील भारतीतील सर्व नागरिकांनसाठी समान हक्क, स्वातंत्र्य, आणि न्याय प्रदान करणारे भारताचे संविधान दि.26 नोव्हेबर 1949 रोजी दिले त्यास आज 75 वर्ष पूर्ण होत असताना शिंदे व हंकारे परिवाराने हाच दिवस निवडून स्री पुरुष समानतेचे दर्शन घडवित सत्यशोधक विवाह पार पाडला त्याबद्ल दोन्ही परिवाराचे अभिनंदन करीत हा आदर्श सर्व समाजाने घेतला तर समाजातील विषमता नष्ट होण्यास मदत होईल असे देखील ढोक म्हणाले.

महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती चे सद्श्य व फुले एज्युकेशनचे अध्यक्ष विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पध्दतीने सत्यशोधक विवाहाचे कार्य महात्मा फुले यांचे वेशभुषेत पार पाडत भाग्यश्री आणि देवेंद्र यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो फ्रेम भेट दिली.तसेच आई वडील यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देण्यात आले. तर महात्मा फुले रचित मंगळाष्ट्काचे गायन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विस्वस्थ प्रा.सुदाम धाडगे आणि गायिका प्रतिभा सोनावणे हिने केले.

या प्रसंगी फुले एज्युकेशनचे वतीने 75 मान्यवरांना संविधान ग्रंथ सोबत राष्ट्रीय संत गुरु रोहिदास यांचे ग्रंथ भेट दिले आणि अक्षता म्हणून सुगंधी फुलांच्या व पाकळ्यांचा वापर केला. विवाहाचे सुरुवातीला वधु वर यांचे शुभहस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि आई वडील यांचे शुभहस्ते संत रोहिदास यांच्या फोटोला हार घालण्यात आला तर महापुर्षांचे विविध ग्रंथाचे पूजन केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मा.कुंदन जमदाडे आणि स्वागत प्रास्ताविक बामसेफ चे बाबासो शिंदे यांनी केले तर आभार शांता हंकारे यांनी मानले.आणि अनिस जमादार यांच्या ऑर्केस्ट्रा टीमने मराठी हिंदी गाण्यासोबत फुले सावित्री आंबेडकर गीतांनी रंगत वाढविली त्यामुळे या संविधानदिनी विवाहाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली होती.