सत्तेसाठी झालेल्या राजकीय नाट्यानंतर नखाते शरद पवारांच्या भेटीला

0
545

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी घेतली शरद पवारांची भेट; भेटीत महत्वपुर्ण विषयांवर चर्चा

पिंपरी/ मुंबई दि.१३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाच्या राजकारणातील बलाढ्य नेते अशी ओळख असणारे देशाचे नेते शरदचंद्र पवार यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुंबई येथे भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबतच कामगार,कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारी या विषयावर चर्चा केली. सत्तेसाठी पक्षामध्ये ओढाताण सुरू असताना पवार साहेबांचे पुरोगामी विचार आणि सर्वसमावेशक धोरण, आणि प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील यांचे संघटन कौशल्य व परिवार संवाद यात्रा महत्त्वाच्या वाटतात अशावेळी “निष्ठावंत” म्हणुन पवार साहेबांसोबत असणे महत्त्वाचे गरजेचे वाटते याच पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण भेट झाली असुन राज्यासह पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय व सामाजिक विषयावरही चर्चा झाली.

कामगारांना भेडसावत असणारे विविध प्रश्न व आपण करत असलेले कार्य याचा संग्रहित कार्य अहवाल यावेळी साहेबांना भेट दिला त्यावेळी सध्या कामगार चळवळीची गरज असून ती प्रखरतेने सुरू ठेवा असा सल्ला पवार यांनी दिला.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा कार्य अहवाल शरदचंद्र पवार यांना देण्यात आला यामध्ये प्रामुख्याने कामगार विरोधी कायदे, शेतकरी विरोधी कायदे तसेच महागाई बेरोजगारी, महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प, महागाई निर्देशांक, असंघटित कामगारांच्या व्यथा यावरून झालेली आंदोलने, याबाबत प्रामुख्याने आढावा घेण्यात आलेला होता पवार साहेब यांनी कामगार नेते काशिनाथ नखाते यांचेशी आपुलकीने सध्याची असंघटित कामगार स्थिती व बेरोजगारीची स्थिती कामगार चळवळी बाबत चर्चा केली आणि सध्याच्या स्थितीमध्ये कामगार संघटनानीं अग्रस्थानी राहून त्यांचेवरील लादले गेलेले संकट व कायदे दूर करण्यासाठी त्यांच्या नाय हक्काची लढाई प्रकर्षाने लढण्याची गरज आहे, ती सुरू ठेवावी असा मोलाचा सल्ला देशाचे नेते पवार साहेब यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.