सत्तेत INDIA की NDA , योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर यांचे परस्पर विरोधी दावे

0
174

देशात आज सहाव्या टप्प्याच मतदान होत असताना देशात सरकार कोण बनवणार? याची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता फक्त काही दिवस उरले आहेत. येत्या 4 जूनला निकाल जाहीर होतील. पण त्याआधी कोण जिंकणार? यावरुन पैजा लागत आहेत. भाजपाप्रणीत NDA आणि काँग्रेस प्रणीत INDIA आघाडीमध्ये सामना आहे. दोन्ही बाजूंकडून जय-पराजयाचे दावे करण्यात येत आहेत. प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल नुकताच एक अंदाज वर्तवला. त्यावरुन सोशल मीडियावर भाजपा समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंगलबंदी रंगली आहे. भाजपा 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती करेल, पण त्यांना 370 जागा जिंकणं जमणार नाही असं प्रशांत किशोर म्हणाले. आता प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सुद्धा भाकीत वर्तवलय.

प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांचे दावे बिलकुल परस्पर विरुद्ध आहेत. योगेंद्र यादव सुद्धा म्हणतात भाजपा तिसऱ्यांदा सरकार बनवेल पण भाजपा किती जागा जिंकणार? या बद्दल त्यांचा अंदाज वेगळा आहे. भाजपाला सलग तिसऱ्यांदा सरकार बनवताना NDA मधील घटक पक्षांची गरज लागेल असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे. प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादव यांच्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट X वर शेअर केले आहेत. चालू लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल काय असेल? त्याबद्दल योगेंद्र यादव यांनी सांगितलेले आकडे त्या स्क्रीनशॉटमध्ये आहेत.

काँग्रेसला किती जागा मिळणार?
भाजपाला लोकसभा निवडणुकीत 240 ते 260 जागा मिळतील, असा योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे. एनडीएमधील घटक पक्षांच 35 ते 45 जागांच योगदान असेल. त्यामुळे ते 275-305 पर्यंत पोहोचतील. योगेंद्र यादव यांच्यामते काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 85 ते 100 जागा मिळतील. इंडिया आघाडीतील घटक पक्षांना 120 ते 135 जागा मिळतील. अशा रितीने विरोधी पक्षांची आघाडी 205 ते 235 जागांपर्यंत पोहोचेल असं योगेंद्र यादव यांचं भाकीत आहेत.

प्रशांत किशोर यांचा अंदाज काय?
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी भाजपाला जवळपास 300 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारविरोधात लोकांच्या मनात फार राग नाहीय असं प्रशांत किशोर यांचं मत आहे. स्वबळावर भाजपाला 370 पर्यंत पोहोचण अशक्य असल्याचा त्यांचा अंदाज आहे.