राज्यात १५ वर्षे लालू-राबडीदेवी यांचे सरकार होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये लालूप्रसाद यादव मंत्री होते; परंतु बिहारच्या विकासासाठी त्यांनी काय केले? आपल्या राजवटीत बिहारमधील तरुणांना रोजगार देण्याऐवजी आपले कुटुंब पोसण्यावर भर दिला. त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले. त्यांची दोन्ही मुले आधी मंत्री झाले आणि आता त्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यादव कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (दि. ३०)राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा गृहजिल्हा असलेल्या गोपालगंजला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ज्यांनी पशुखाद्यातही गैरव्यवहार केला ते राज्यातील लोकांच्या हिताचा विचार करू शकत नाहीत, असे शहा म्हणाले. लालूप्रसाद यादव यांचा डांबर गैरव्यवहार, पशुखाद्य गैरव्यवहार, पूरग्रस्तांसाठी दिलेल्या साहित्यात गैरव्यवहार, चरवाह विद्यालय गैरव्यवहार यांसारख्या अनेक गैरव्यवहारांमध्ये लालूप्रसाद यादव यांचा सहभाग आहे.
लालूप्रसाद यादव यांनी आपल्या राजवटीत बिहारमधील तरुणांना रोजगार देण्याऐवजी आपले कुटुंब पोसण्यावर भर दिला. त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले. त्यांची दोन्ही मुले आधी मंत्री झाली आणि आता मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत. एक मुलगी खासदार आहे, तर दुसऱ्या मुलीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्याआधी त्यांची पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. राबडीदेवी यांचे दोन्ही भाऊ मंत्री झाले आणि वहिनीलाही नेता करण्यात आले. यामुळे त्यांचे सर्व कुटुंब राजकारणात असून, ‘सेट’ झाले आहे; परंतु यातील कोणीही बिहारच्या तरुणाईला सक्षम करू शकले नाही. काँग्रेस आणि इतर पक्षांनी जेवढी कामे केली आहेत, त्यापेक्षा जास्त काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहा वर्षांत देशासह राज्यात केले आहे. राज्यात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी लालूप्रसाद यादव यांना जोरदार लक्ष्य करत त्यांच्या कार्यकाळात राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सत्तेचा उपयोग कुटुंब पोसण्यासाठी केला, असा घणाघाती आरोपही केला.