सत्ता परिवर्तनाची चर्चा जोरात, अधिकाऱ्यांपासून प्रसारमाध्यमांमध्येही बदल घडण्याचे संकेत

0
207

सोशल मीडियावर सद्या सत्ताबदलाचे संकेत देणारा एक मेसेज तुफान व्हायरल झाला आहे. शेअर मार्केटमधील घसरगुंडी, अधिकाऱ्यांची चुळबुळ, मोदींची भलावणा करणाऱ्या माध्यमांची भाषा तसेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुध्दा बदललेली भाषणे हे सर्व बदलत्या राजकीय परिस्थितीचे इंडिकेटर असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर ५४३ पैकी २८८ जागांवरचे मतदान पूर्ण झाले आहे. अद्याप चार टप्पे बाकी आहेत, मात्र अनेक राजकीय विश्लेषकांनी मोदी सरकारला बहुमत मिळत नसल्याने त्रिशंकु संसद अस्तित्वात येणार किंवा थेट सत्ता बदल होणार असल्याचे सांगायला सुरवात केली आहे. भाजपचे केंद्रातून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे. मतांची टक्केवारी आणि भाजपच्या कोअर व्होट बँकेची उदासीनता यामुळे भाजपचीसुध्दा झोप उडालेली आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या आणि भाजपच्या सुरक्षित राज्यात देशातील सर्वात कमी मतदानाने आता केंद्रात सत्तापरिवर्तन निश्चित असल्याचे दाखवून दिले आहे.

आधी अधिकारी आणि आता माध्यमांनाही भाजपची सत्ता जाण्याची जाणीव झाली आहे, त्यामुळेच अधिकारी भाजप नेत्यांपासून दुरावू लागले आहेत.

▪️ इंटेलिजेंस ब्युरो आणि इतर ग्राउंड रिपोर्ट्समधून सरकारपर्यंत पोहोचलेल्या सत्ताबदलासंबंधीचे इनपुट्स हा अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे.

▪️ दिल्लीत प्रतिनियुक्तीवर नियुक्त झालेल्या काही अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्ती संपवून त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्यासाठी अर्ज केला आहे.

▪️ गुजरातच्या अधिकाऱ्यांचाही अचानक केंद्रीय गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाबाबत भ्रमनिरास झाला आहे. त्यांच्यात मूळ राज्यात अर्थात गुजरातमध्ये परतण्यासाठी अर्ज केलेल्या अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संख्या आहे.

▪️ सूत्रांच्या म्हणण्यानूसार 16 एप्रिल 2024 रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग ही देखील सामान्य घटना नाही. यामागेही सत्तापरिवर्तनाची कहाणी आहे.

▪️ मध्य प्रदेशातील वल्लभ भवन मंत्रालयात ९ मार्च २०२४ रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे केंद्र सरकारच्या अनेक योजनांची कागदपत्रे जळून खाक झाली. हा देखील ‘पुरावे जाळण्याचा’ कार्यक्रम असल्याचे दिसते.

▪️माध्यमांचा सूरही बदलू लागला आहे. गेल्या तीन महिन्यांत एकाही वृत्तवाहिनीने नरेंद्र मोदींचे विश्वगुरू म्हणून वर्णन करणारी एकही बातमी प्रसारित केलेली नाही.

▪️ झी न्यूजचे मालक सुभाष चंद्रा यांनी भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्य धोक्यात असल्याचा व्हिडिओ जारी केला आणि मोदी सरकारच्या विरोधात जाहीरपणे वाच्यता केली आहे.

▪️ इंडिया टुडेने काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पसरवलेले खोटे उघड करून बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

▪️ ज्या वृत्तपत्रे/चॅनल्स काँग्रेसच्या जाहिराती छापण्यास/दाखवण्यास नाखूष होत्या, त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर त्यांची भूमिका बदलली आहे.

▪️ राष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रसारमाध्यमे हळूहळू भाजप सरकारच्या कुशीतून उतरून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपची कोअर व्होट बँक असलेल्या बूथवर मतदानाबाबत उत्साह नसताना तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर बदलाचा हा आवाज अधिक ठोस झाला. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतही मतदान संपण्यापूर्वीच भाजपचे पोलिंग एजंट मतदान केंद्रातून गायब असल्याचे आढळून आले.

“यावेळी आम्ही 400 जागांचा आकडा पार करू” ही भाजपची भन्नाट घोषणा आता “यावेळी 400 जागांवर हरणार” इथपर्यंत बदलली आहे.

काळ बदलत आहे, तुम्ही पण बदलाचा एक भाग बना